loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Jun 7, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखेत प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी पालकांनी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल ऋण व्यक्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे मनमाड केंद्रात सर्व शाखांमधून कुमारी उत्कर्षा जितेंद्र पवार ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
विज्ञान शाखा
प्रथम घुगे धनश्री बाळू
द्वितीय बोरसे प्रसाद गणेश
तृतीय कुलकर्णी पूर्वा प्रशांत
वाणिज्य शाखा
प्रथम पवार उत्कर्षा जितेंद्र
द्वितीय बहरीनवाला युसुफ मुस्तझा
तृतीय गुप्ता मानसी लक्ष्मीनारायण
कला शाखा
प्रथम पाटील मयंक दीपक
द्वितीय पगारे त्रिवेणी रवींद्र
तृतीय वाघ प्रवीण धर्मराज
व्यावसायिक अभ्यासक्रम (H.S C. Vocational)
प्रथम* १)वानखेडे साक्षी भाऊसाहेब
द्वितीय गोटे मयुरी रावसाहेब
तृतीय पगारे निकिता राजू.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ प्रशांत दादा हिरे, समन्वयक अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते डॉ. अद्वयआबा हिरे, विश्वस्त संपदा दीदी हिरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे, कुलसचिव श्री समाधान केदारे महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड व आभार प्रदर्शन प्रा. दिलीप कातकडे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.