loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

Jun 9, 2023

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र असताना याठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या नांदगाव बाजूकडील गोडाऊन क्रमांक १०२ मध्ये ५ व ६ जूनच्या रात्री ही चोरी झाल्याची घटना आहे.कर्मचारी सकाळी कामावर आल्यानंतर गोडाऊनचे शटर वाकवून चोरी झाल्याचे कर्मचाऱ्यांचे लक्षात आल्याने या घटनेबाबत पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आली.पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

या चोरीमध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेले एफ आर के ब्रँडची ५५ पोती तांदूळ,अंदाजे २७ क्विंटल ५० किलो वजन,ज्याची बाजारात किंमत रुपये १०,२५७ असल्याची समजते.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकाच्या मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊन मधून झालेली ही चोरी म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र असताना सुद्धा सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचा हा प्रत्यय म्हणावा लागेल.त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे समोर येत आहे.यावर प्रशासन काय तोडगा काढते? आणि या चोरीचा गुन्हा कसा उलगडला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.