loader image
[ays_poll id=7]

नांदगाव भुमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार – शिवसैनीकांनी लावले टाळे

Jun 13, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील तालुका भुमीअभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराला कंटाळून त्रस्त नागरिक आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सोमवार (दि.१२) रोजी उप अधिक्षक भुमीअभिलेख च्या कार्यालयाला सायंकाळी सुट्टी च्या वेळी टाळे ठोकल्याने   उपअधिक्षक श्रीमती योजना अकोलकरसह इतर  कर्मचारी कार्यालयात अडकले होते. तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांच्या मध्यस्थीनंतर येत्या तीन दिवसांत बैठक बोलवून चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भुमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे आमदार सुहास कांदे यांनी देखील आंदोलन केले होते. तरीही कामकाजात सुधारणा झाली नसुन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतरही मनुष्यबळाच्या तुटवड्याची कारणे देत काम लांबणीवर टाकले जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. आजपर्यंत मोजणीची १७० प्रकरणे शिल्लक आहेत. वारंवार चकरा मारूनही मोजणी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोणत्याही प्रयोजनासाठी जमिनीचा वापर होणार असेल, तर त्या जमिनीचा मोजणीशी संबंध येतो. जमीन मोजणीचे काम भूमिअभिलेख विभागाद्वारे केले जाते.
जमीन मोजणीची प्रकरणे तातडीने किंवा कमीत कमी कालावधीत निकाली निघणे गरजेचे आहे. परंतु, त्यासाठी ही प्रकरणे कोणत्या कारणांनी प्रलंबित राहतात, तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सेवा हमी कायद्याचा प्रभावी वापर होणे गरजेचे असून,  प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी या विभागाने ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यायला हवा, अशी अपेक्षा आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी भूमिलेखच्या उप अधीक्षक श्रीमती योजना अकोलकर यांच्यासह मुख्यालय सहाय्यक ज्योती चव्हाण ‘ शिरस्तेदार दत्ता सोनवणे नागरे मॅडम पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील ‘ राजू मोरे यांनी आंदोलन कर्त्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी येत्या तीन दिवसात भूमी अभिलेखचे अधिकारी तहसीलदार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणाबाबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले तसेच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून कामांचा निपटारा करावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही असेही कर्मचाऱ्यांना सुनावले. संबंधित कार्यालय भव्य अशा प्रशासकीय संकुलात स्थलांतरित करावे आणि याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करावा शक्य तितकी मदत महसूल विभागाकडून आपणास करण्यात येईल असे सांगितले. सुमारे सव्वा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ देशमुख, मजूर फेडरेशन अध्यक्ष प्रमोद भाबड, सुनील जाधव,,डॉ. सुनील तुसे, चंद्रशेखर कवडे, राजाभाऊ पवार, नुतन कासलीवाल, सागर हिरे, नंदु पाटील, कपिल तेलुरे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.