loader image
[ays_poll id=7]

के. आरटी शाळेत राजमाता जिजाऊंना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Jun 17, 2023

के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समृद्धी सचिन भाबड व चैतन्य शरद जोगदंड या दोघांनी सुंदर अशी माहिती व विचार मांडले.छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चारित्र्य,चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी 17 जुन रोजी असते. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला होता. मराठा साम्राज्याच्या संस्थापक. म्हणून देखील त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी पडली होती. विशेष म्हणजे ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात- या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या, अशा थोर माता जिजाऊंना माझा
मानाचा मुजरा : कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपेक्षा मनोज पगारे हिने केले, या विद्यार्थीना वैशाली शेजवळ यांचे अनमोल असे मागदर्शन मिळाले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.