loader image

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

Jun 17, 2023


महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आयोजित सुपरलीग या 16 वर्षांआतील क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा या खेळाडुची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातुन खेळाडुंची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली. मागील महिन्यात झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील सामन्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रदर्शनाच्या जोरावर मनमाडच्या या खेळाडुला महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या अंडर 16 प्रेसिडेंट इलेव्हन या संघात संधी देण्यात आली. नंदुरबार संघाकडून खेळताना रुषीने 16 बळी प्राप्त केले तसेच स्पर्धेत 130 धावा करुन अष्टपैलु कामगीरि केली. रुषीचे यापुढील सामने हे पुणे येथे खेळवले जाणार आहेत. या सामन्यांमधुनच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघाचा अंडर 16 संघ निवडला जाणार आहे. महाराष्ट्र संघात मनमाडचे नेतृत्व रुषी करो अशा अपेक्षा करण्यात येत आहे.

या कामगिरीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान मोमीन यांनी रुषीचे अभिनंदन करुन त्याचा सत्कार केला व पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
रुषी शर्माचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.
भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ ईरफान मोमीन , मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , श्रेणिक बरडिया , तय्यब शेख , राहुल साबळे , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्माचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.