loader image

वारकऱ्यांसाठी शासनाची ” विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र ” योजना

Jun 21, 2023


महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने वारीच्या ३० दिवसांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘या’ बाबींचा समावेश :

– एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
– दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
– अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील
– वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होऊन त्यात वारकरी बांधव जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या आपत्तीमध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

.