loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूलमध्ये योग दिवस साजरा

Jun 21, 2023


कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कु अनुज संसारे, अथर्व लव्हाटे व झालटे सर यांनी मार्गदर्शन केले. भुजंगासन, वज्रासन, ताडासन पर्वतासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पद्मासन, नौकासन अर्धचक्रासन, दंडासन, कपालभाती, सूर्यनमस्कार याची प्रात्यक्षिके ‘विद्यार्थ्यांकडून करून घेतली. प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इ. ५वी चा सार्थक बऱ्हाणपुरकर व निरजरा बुरड यांनी योगाविषयी माहिती दिली. मानवी जीवनात शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरांवर योगाने विकास घडवून आणता येतो. त्याचा प्रत्यय जे लोक योगा करतात त्यांना असतो. असे लोक योग प्रचार करण्यास अत्यंत योग्य व्यक्ती असतात. संपूर्ण जगात योग प्रचार भाग तर मानवतेला भारत देश आणि योगा जीवन पध्दती ही सकारात्मक आणि शांतता पूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक होऊ शकेल. संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवन पद्धती अंगीकारण्याचे आव्हान केले जाते. त्यासाठी १० वी च्या प्रसिद्धी दखणे, जागृती लव्हाटे, वैष्णवी पाटील, तनुजा पगारे यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व या दिवशी समजावून सांगितले .

आपण आपले आरोग्य जपणे फार महत्वाचे झाले आहे. आणि योगा हे एकमेव साधून तसेच माध्यम आदि : जे आपणास सदैव शारिरीक आणि मानसिक दृष्या निरोगी राहण्यास मदत करते. आजाराशी लढण्यासाठी आपल्या शरीरात शक्ती निर्माण करते. हेच योगाचे अनन्य साधारण महत्त्व पटवून दयायला दरवर्षी एक विशेष दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात असतो आणि जो म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन. विद्यार्थ्यांना सौ. श्वेता द्विवेदी, वैशाली शेजवळ यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिदधी दखणे हिने केले.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.