loader image

सुपरलीग स्पर्धेत पुणे संघा विरोधात रुषी शर्माने घेतले 10 बळी

Jun 22, 2023


 

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय सामण्यातुन निवड झालेल्या खेळाडु व संघामध्ये अंडर 16 सुपरलीग
ही स्पर्धा पुण्यात रंगत आहे. महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्यासाठी ह्या सामण्यांमध्ये सर्व संघ व खेळाडु जोरदार प्रयत्न करत आहे. या स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा संघ प्रेसिडेंट इलेव्हन या संघाकडून निवडला गेला. सुपरलीग स्पर्धेतील आपल्या पहिल्या व स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात रुषीने पुण्यातील सी एन ए अंडर 16 संघाविरुद्ध खेळताना 10 विकेट मिळवल्या. 2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात रुषीने पहिल्या डावात 3.5 षटकामध्ये 4 धावा देत 4 विकेट मिळवले ज्यात 2 निर्धाव षटके होती तसेच दुसर्या डावात 13.3 षटकात 27 धावा खर्च करुन 6 विकेट मिळवले ज्यात 5 निर्धाव षटके रुषीने केले. गोलंदाजीच्या या जोरदार जोरावर प्रेसिडेंट इलेव्हन संघ हा सामना 2 धावा व एक डाव राखुन सहजरित्या जिंकला.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी मनमाडच्या या खेळाडुला मॅन ऑफ द मॅच ( सामनावीर ) चा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्यासाठी रुषी शर्माला अशाच प्रकारच्या प्रदर्शनाची गरज पुढिल होणाऱ्या सामण्यातही आहे.

मनमाड शहरातुन सातत्याने रूषी शर्मा हा जिल्हा संघासाठी खेळत आहे व प्रथमच सुपरलीग सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा मान त्याला मिळाला आहे. रुषीच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी रुषीचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन त्याला लाभत आहे.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन , मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत , जावेद ( मुन्ना ) सर , मनोज ठोंबरे सर , सनी अरोरा सर , नितीन अहिरराव तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा यांचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
.