loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव बस स्थानकात एस . टी बस जळून खाक

Jun 24, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव आगारातील बस नेहमीच नादुरुस्त झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात मात्र आज सायंकाळच्या सुमारास नांदगाव आगाराची बस चाळीसगाव येथून नांदगाव बस स्थानकात  येवून थांबली असताना चालक,वाहक आणि प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर काही वेळेतच बसच्या खाली चालकाला आग लागलेली दिसली असता काही क्षणातच बसने  पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नांदगाव आगारातील बस मुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट परिवहन महामंडळ पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव आगराची बस आज सायंकाळी चाळीसगाव येथून नांदगाव एम . एच ०७ सी ९३३७ स्थानकात  येऊन उभी राहिली चालक
डी.ए.थोरे, वाहक ए.एस.ताडगे आणि बसमधील चार प्रवासी
हे बस च्या खाली उतरल्यावर चालक हे वाहतूक नियंत्रक कक्षात नोंदणी कराययास गेले नंतर त्यांना बसच्या खाली आग लागलेली दिसली असता त्यांनी आगार व्यवस्थापक विश्वास गावीत यांना दुरध्वनी वरुन माहिती दिली.नांदगाव  आगारातील कर्मचारी व यांत्रिक कर्मचाऱ्यासह क्रांती निळे,
राहुल पगारे ,प्रकाश पेहरे ,सिद्वार्थ पवार आदी स्थानिक नागरिकांनी  आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.तसेच८ आगा विझविण्याचे छोटे युनिट आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु वारा वाहत असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले. नांदगाव नगरपरिषदेकडे अग्निशमन बंब नसल्याने खाजगी पाणी टँकर बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत बस ने संपूर्ण पेट घेतला.अथक प्रयत्न करूनही बस ला विझवण्यात नांदगाव आगारातील स्थानिक कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांना यश आले नाही व बस
जळून खाक झाली. मनमाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते..मनमाड अग्निशमन बंबाची गाडी आल्यानंतर
राहिलेली आग विझविण्यात आली आहे..
दरम्यान ,
या आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बस
स्थानकात आगीचे मोठे लोळदिसून येत होते. या घटनेमुळे नांदगाव आगारातील बसच्या बाबतीत गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

 

 

 


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.