loader image
[ays_poll id=7]

बी.जी. दरगुडे शाळेमध्ये आषाढी निमित्ताने दिंडी सोहळा संपन्न

Jun 28, 2023

मनमाड : ( योगेश म्हस्के ) पंढरीची वारी (आषाढी दिंडी ) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार आहे , आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला जात आहे.

ही पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या या दरवर्षी आषाढी निमित्ताने पंढरपूरकडे जात असतात. याच आपल्या संस्कृतीची , संत परंपरेची ,आषाढी वारीची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी या निमित्ताने आज बी.जी.दरगुडे शाळेमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई , वारकरी आणि विविध संतांच्या वेशभूषा करून , हातामध्ये टाळ-पताका , डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन , ढोल-ताशाच्या गजरामध्ये शाळेपासन ते मुरलीधर नगर , माधव नगर , बुधलवाडी परिसरामध्ये दिंडी काढण्यात आली.

या दिंडीमध्ये बी.जी. दरगुडे शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
.