loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा….

Jul 3, 2023


मनमाड : योगेश म्हस्के – गुरूर ब्रम्हा..गुरूर विष्णु… गुरूर देव महेश्वरा..गुरूर साक्षात परब्रम्ह..तसमे श्री गुरुवे नमः..अर्थात गुरुच्या रुपातच ब्रम्हा -विष्णु-महेश यांचे स्वरूप आहे.आषाढ शुल्क पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस , महर्षी वेदव्यास पौर्णिमा म्हणुन देखिल गुरुपौर्णिमेचा दिवस ओळखला जातो.

माता-पिता आपलेे प्रथम गुरू असतात, त्यामुळेच मातृ-देवो-भव , पितृ-देवो-भव , आचार्य-देवो-भव असा उल्लेख आढळतो. अर्थात आई-वडील-गुरू देवा समान असतात.गुरू-शिष्य परंपरा तसेच गुरुकुल शिक्षण पद्धती याचे महत्व पुराणकाळात आढळते.भारतीय संस्कृतीत आणि परंपरेमध्ये गुरूंना आदराचे आणि उच्चस्थान दिलेले आहे.

मनमाड शहरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती-भावाने साजरा करण्यात आला. शहरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये अभिषेक पुजन आणि महाआरती , श्री गजानन महाराज मंदिर येथे अभिषेक पुजा , होम-हवन आणि महाआरती , श्री स्वामी समर्थ केंद्र आणि मंदिर येथे अभिषेक पुजन ,आरती आणि महाप्रसाद , श्री दत्त मंदिर आणि परिसरातील वै.बालकदास महाराज , वै.ताहनजी बाबा देटके ,वै. सीताराम बाबाजी समाधी या सर्व मंदिरामध्ये सकाळी महाअभिषेक पुजा , सत्यनारायण पुजा ,आरती करण्यात आली. रायपुर येथील श्री संतधाम येथे संतांच्या समाधीचे पुजन करून , किर्तन आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधलवाडी येथील श्री संत साळीबाबा यांच्या समाधी मंदिर येथे देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने परिसरात दिंडी प्रदक्षिणा करून किर्तनाचे आयोजन करून आणि महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले.मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारा मध्ये देखील गुरुपौर्णिमा निमित्ताने भजन ,किर्तन आणि लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा निमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.

सकाळ पासुन शहरातील भाविक-भक्त आणि नागरिक मोठया संख्येने गुरुपौर्णिमा निमित्ताने मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.