loader image
[ays_poll id=7]

सप्तशृंगी गडाच्या घाटात बस दरीत कोसळली – अनेक प्रवाशी जखमी

Jul 12, 2023

आज पहाटे ६.३० च्या दरम्यान सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.