loader image

फलक रेखाटन दि. १० एप्रिल २०२५ भगवान महावीर जयंती

Apr 9, 2025


जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तीमंत प्रतिक होते. बिहार मधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात (पूर्वीचे वैशाली राज्य) कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला.
वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रावणी दीक्षा घेतली बारा वर्षे त्यांनी मौन पाळले. त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर जनकल्याणासाठी त्यांनी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याकाळी प्रचलित अर्ध मागधी भाषेचा त्यांनी आधार घेतला. त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य ,अस्तेय,अपरिग्रह व ब्रह्मचर्य स्वीकार केले. त्याग, संयम, प्रेम करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. चतुरविध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष आहे असे सांगून भगवान महावीरांनी या संदेशाचा प्रसार केला.
भगवान महावीर यांना जयंती निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
व सर्व जैन बांधवाना महावीर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !
– फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर,संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.