loader image

बघा व्हिडिओ – मुकुंद आहेर ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी

Jul 12, 2023


कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जिंकले भारतासाठी दोन सुवर्णपदके
उत्तर प्रदेश नोएडा येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जय भवानी व्यायामशाळेचा राष्ट्रीय विक्रमवीर आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 106 किलो स्नॅच व 133 किलो क्लीन जर्क असे 239 किलो वजन उचलून ज्युनियर व सीनियर या दोन्ही गटात दोन सुवर्णपदके पटकावीत भारतीय संघासाठी ऐतिहासिक यश संपादन केले आहे
मुकुंद आहेर यास भारतीय संघाची प्रशिक्षक तृप्ती पाराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.