loader image
[ays_poll id=7]

इंग्लंड स्थित प्रियंका घोंगाणे ( सालपे) यांचे कडून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Jul 12, 2023


नांदगाव

नांदगावच्या रहिवासी व सद्या इंग्लड येथे स्थाईक असलेल्या प्रियंका घोंगाणे ( सालपे ) यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयातील ४१ विद्यार्थी/ विद्यार्थीनींना शालेय गणवेश मोफत वाटप केले.

शहरातील प्रसिद्व व्यापारी व वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयाचे अध्यक्ष उमाकांत घोंगाणे यांची मुलगी प्रियंका सालपे ही इंग्लड येथे वास्तव्यास आहेत. त्या नांदगाव येथे माहेरी आल्या असता विद्यार्थ्यां प्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून त्यांनी वाखारी येथील किसान माध्यमीक विद्यालयातील ४१ गरीब विद्यार्थी / विद्यार्थीनींना गणवेशाचे वाटप करण्याचा मनोदय कुटुंबातील व्यक्तींजवळ व्यक्त केला. लागलीच विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांच्या बरोबर संपर्क साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांनी प्रियंका सालपे यांचे स्वागत केले तर रत्नप्रभा पाटील यांनी शाल देवून सत्कार केला.
यावेळी प्रियंका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानां सांगीतले की, आपण ग्रामीण भागातील मराठी मिडीयम मध्ये शिक्षण घेत असाल तरी आपण स्वतःला कमी समजायचे नाही. मी सुद्वा मराठी मिडीयम मध्ये शिकलेली आहे. आई, वडील, शिक्षकांचा नेहमी आदर करा. स्वतःला कुठेही कमी समजू नका .
यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे संजय काकळीज, पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी वाखारी ग्रामस्थाकडून प्रिंयका हिचा सत्कार केला.
यावेळी मुख्याध्यापक पोपट चव्हाण, शिक्षक दत्तात्रय महाजन, सुनील हिंगमीरे, ऋषी डोमाडे, नंदू दंवगे, रत्नप्रभा पाटील, रोहीणी गोराडे, महेष निकम, पत्रकार सोमनाथ घोंगाणे आदी मान्यवर उपस्थीत होते.


अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.