loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये विद्यार्थी पदग्रहण आणि शपथविधी सोहळा संपन्न

Jul 15, 2023

मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये नवनिर्वाचित शाळा नायक नायिका विद्यार्थी, क्रीडा प्रमुख विद्यार्थी, गटप्रमुख उपगटप्रमुख , शिस्तीचे मॉनिटर्स आदींचा पदग्रहण व शपथविधीचा सोहळा नुकता संपन्न झाला. यावेळी निवडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम व क्रीडा शिक्षक श्री सुधाकर कातकडे यांनी पदाची व कर्तव्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्नील बाकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ लीना जाधव यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम, माननीय पर्यवेक्षिका सिस्टर जोत्स्ना, मनमाड धर्मग्रामाचे प्रमुख फादर साहाय्यराज, त्याचप्रमाणे फादर लॉईड व शाळेतील चारही गटाचे गटप्रमुख शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. यावेळी माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम व फादर साहाय्यराज यांनी समायोजित भाषणे करून नवनिर्वाचित विद्यार्थी प्रमुखांना शुभेच्छा दिल्यात. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना बॅजेश व स्लॅसेस दिले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.