loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Jul 18, 2023

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवे चे ही ब्रीद वाक्य घेऊन 109 वर्षाची शतकोत्तर वाटचाल मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 55 वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत गत 55 वर्षात हजारो शालेय विध्यार्थी नी सहभाग घेतला आहे यंदाही हिच परंपरा पुढे सुरु ठेवत मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे रविवार दि.23 जुलै 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता छत्रे हायस्कुल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे तर विध्यार्थी मध्ये भाषण कला,वक्तृत्व कला वाढीली पाहिजे म्हणून आंतरशालेय कथाकथन स्पर्धा सोमवार दि.31 जुलै 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता इंडियन हायस्कुल लोकमान्य सभागृह येथे मंगळवार दिनांक 01 ऑगस्ट रोजी सकाळी 09-30 वाजता आंतरशालेय वक्तृत्व नियोजीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे विषय व नियमावली चे माहितीपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले असून स्पर्धे च्या सहभाग साठीची नावेग्रंथपाल मनमाड सार्वजनिक वाचनालय शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी नोंदवावी निबंध स्पर्धे साठी नोंदणी ची मुदत रविवार दिनांक 23 जुलै 2023 ला सकाळी 10 वाजेपर्यंत आहे तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धे साठी शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 ला सायंकाळी 05 वाजे पर्यंत नोंदणी ची मुदत आहे या आंतरशालेय स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व्यक्तिगत पारितोषिक रोख व पुस्तक /प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात येईल तसेच या सर्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विध्यार्थ्यांना सहभाग प्रमाण पत्र देण्यात येईल या स्पर्धेत परीक्षकांन चा निकाल अंतिम राहील आणि तो सर्व स्पर्धकांन वर बंधनकारक राहील वक्तृत्व स्पर्धा झाल्या नंतर दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी त्याच ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येईल तरी मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा,संचालक नरेश गुजराथी माजी अध्यक्ष सुरेश शिंदे,प्रदीप गुजराथी उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट आदीं सह संचालक मंडळाने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.