भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
मनमाड 🙁 योगेश म्हस्के )थोर समाज सुधारिका , स्त्री शिक्षणाच्या जनक , कवियत्री , ज्ञानज्योती...











