loader image
[ays_poll id=7]

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

Jul 25, 2023


मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात उभारल्या जाणाऱ्या ३ नव्या जलकुंभाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे विशेष प्रयत्न करत आहे. करंजवण धरणात २७ मीटर उंच व ८ मीटर रुंदीची जॅकवेल (विहीर) उभारण्याचे काम सुरु झालेले असून पैकी १५ मीटर उंचीचे काम झालेले आहे. उरलेल्या १२ मीटरचे कामास अर्धवट सोडावे लागले आहे. करंजवण धरणात पावसाचे पाण्याचा साठा वाढल्याने झालेल्या १५ मीटरच्या कामापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे हे काम थांबवावे लागले आहे. या योजनेअंतर्गत मनमाड शहरातील माऊली नगर, मुरलीधर नगर आणि जयजवान ढाब्यालगतच्या वसाहतीत प्रत्येकी एक जलकुंभ उभारण्याचा कामाला ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात येणार असून येत्या ५-६ दिवसात पहाणी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या जागेबाबतचे प्रस्ताव पाटबंधारे व त्याच्याशी संबंधित विभागाकडे मंजूरीसाठी पाठविलेले असून येत्या १५-२० दिवसात त्यास मंजूरी मिळून करारनामा करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. लवकरच हा करार होत असून करंजवण योजनेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी ह्या ठरल्याप्रमाणेच होत असून योजनाही ठरलेल्या मुदतीत कार्यान्वयीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे शहराला जीवनदायी ठरणारी ३१२ कोटी रुपयांच्या करंजवण योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्काळ जलद गतीने कामकाज सुरू असून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी २० स्पॉटपैकी १२ ते १५ ठिकाणी गॅप भरुन पुर्ण करण्याचे काम वेगाने होत आहे. मानसी रोज १३५ लिटर पाणी मिळण्यासाठी एकूण १५ लहान-मोठ्या टाक्या बनविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जलवाहिनी योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे – कंप्युटरराईज फायबर ऑप्टिकलने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे कुठेही एक थेंब पाण्याची गळती झाल्यास लगेच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलवाहिनीतून पाणी चोरणे अशक्य होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….

योगेश म्हस्के मनमाड : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई...

read more
मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न

मनमाड,ता.२१: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा...

read more
दृष्टीक्षेप  – विश्वचषक 2023 विशेष संदीप देशपांडेन्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मतभारताला दाखवावीच लागेल

दृष्टीक्षेप – विश्वचषक 2023 विशेष
संदीप देशपांडे
न्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मत
भारताला दाखवावीच लागेल

भारतात खेळवली जाणारी विश्वचषक स्पर्धा आता प्रत्येक दिवसागणिक व सामन्यागणिक रंगतदार होते आहे....

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप...

read more
मनमाड महाविद्यालयात समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिसानिमित्त आरोग्य शिबिर व व्याख्यानाचे आयोजन

मनमाड महाविद्यालयात समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिसानिमित्त आरोग्य शिबिर व व्याख्यानाचे आयोजन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा...

read more
.