loader image
[ays_poll id=7]

आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर

Jul 27, 2023


आ.सुहासअण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन आज युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांचे हस्ते संपन्न झाले
यावेळी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विष्णू निकमसर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप सरपंच सौ.सारिका जेजुरकर, उपसरपंच दीपक खैरनार, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते..
यावेळी विष्णू निकम यांनी आपल्या मनोगतातून आ. सुहास आण्णा कांदे यांच्या दातृत्वाविषयी माहिती देतांना सांगितले की, आ.सुहास आण्णा कांदे हे विविध विकास कामांसाठी कुठलाही भेदभाव न करता भरघोस निधी उपलब्ध करून देत असतात. आतापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
प्रास्ताविकात राजाभाऊ जगताप यांनी मल्हारवाडी गावात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भविष्यातही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी केली.. मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) येवला रोड ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी खैरनार, सुनंदा झेंडे, शोभा पिठे, दिगंबर भागवत, अरुण भोसले, मधुकर ईघे,वाल्मीक काकळीज, भागिनाथ गोविंद, भाऊसाहेब पिठे, नंदू परदेशी, बापू ईघे, आबासाहेब खैरनार, चंद्रभान गोविंद, जयराम मोकळ, प्रकल्प पाटील आदींसह मल्हारवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकल्प पाटील यांनी तर आभार संदीप जेजुरकर यांनी मानले..


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.