Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर – ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Jul 29, 2023

चांदवड तालुक्यातील शिंगवे गावच्या परिसरात चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रस्त्याच्या कडेला बिबट्या फिरताना आढळून आला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

शिंगवे गावाच्या पंचक्रोशीत मोठा डोंगराळ भाग आहे. या डोंगराळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे येत असल्याने रात्रीच्या वेळी त्याच्या डरकाळ्याचा आवाज येतो. सध्या, शेती कामांना वेग आल्याने रात्रीबेरात्री शेतकरी घराबाहेर असतात. अशा वेळी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्यास जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांकडे वळावे- डॉ. सिद्धार्थ मोरे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांकडे वळावे- डॉ. सिद्धार्थ मोरे

नांदगाव सोमनाथ घोंगाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा...

read more
अंगणवाडी मनमाड विभाग येथे अँनिमिया कँम्पचे आयोजन नांदगाव तालुक्याचे आमदार माननिय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी  दिली भेट

अंगणवाडी मनमाड विभाग येथे अँनिमिया कँम्पचे आयोजन नांदगाव तालुक्याचे आमदार माननिय श्री. सुहास आण्णा कांदे यांनी दिली भेट

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी मनमाड विभाग आणि उपजिल्हा...

read more
अंगणवाडी मनमाड विभागात करण्यात आली. मुलांची  आरोग्य तपासणी आणि गरोदर महिलानां मार्गदर्शन

अंगणवाडी मनमाड विभागात करण्यात आली. मुलांची आरोग्य तपासणी आणि गरोदर महिलानां मार्गदर्शन

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक २ अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्र.८१...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]