चांदवड
तालुक्यातील वाकी बुद्रुक गावाच्या परिसरात शुक्रवारी (दि. २८) मोकाट कुत्र्यांनी मोरावर हल्ला करून जखमी केले होते. या जखमी मोराला पोलिसपाटील रत्ना पोळ व सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी पाणी पाजल्याने मोर शुद्धीवर आला. त्यानंतर मोर पुन्हा वनात उडून गेला. चांदवड शहर व तालुक्यातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. हे कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या – नागरिकांवर हल्ले करीत आहेत. आता तर या कुत्र्यांनी मोर, गाय यांच्यावर हल्ले करणे सुरू केले आहे. यामुळे तालुक्यातील मोकाट कुत्र्यांचा
प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी झाल्टे यांनी केली आहे.
मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
मनमाड येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद...











