loader image
[ays_poll id=7]

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

Aug 5, 2023


केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु.४४.८० कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु. २०.०३ कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु.१०.१० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रु. १०.१४ कोटी, निधी मंजूर करण्यात आला असून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होऊन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाड येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहेत व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे राज्यमंत्री दर्शना ज़रदोष यांची उपस्थिती असणार आहे.
या योजनेअंतर्गत विविध अद्यावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरीकांकडुन सर्व स्तरावर आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे.विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह स्वच्छतागृह, नवीन फूटओवर बीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने डॉ. पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व रेल्वे मंत्रालायचे आभार व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
.