आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव मनमाड व मतदार संघातील विविध गावांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मनमाड शहरातील विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या आमदार आपल्या दारी या महा शिबिराच्या अंतर्गत हजारो नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला यामध्ये रेशन कार्ड संबंधित विविध अडचणी नवीन रेशन कार्ड तसेच विविध दाखल्यांसाठी हजारोंनी प्रकरणी जमा केली होती.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करत लाभार्थी नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखले शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे देण्यात येत आहे. यामध्ये 310 रेशन कार्ड व 250 दाखले तयार झाल्यानंतर मनमाड येथील शिवसेना कार्यालयात संबंधित लाभार्थ्यांना पाचारण करून त्यांना सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, शहर उपप्रमुख मच्छिंद्र सांगळे, विकी कातारी, आशिष पाराशरे,सचिन दरगुडे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.
गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – प्रवाशी संघटनेची मागणी
गोदावरी एक्सप्रेस व मनमाड इगतपुरी शटल सेवा मनमाड वरून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी व मनमाड,...










