loader image
[ays_poll id=7]

नाशिकचा तहसीलदार १५ लाखाच्या लाच प्रकरणी ए सी बी च्या जाळ्यात

Aug 5, 2023


नाशिक येथील तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर) तब्बल १५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात महसूल सप्ताह साजरा होत असतानाच तहसिलदार लाच घेताना सापडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे. यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले. याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले. परंतु जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली. त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज लाच म्हणून स्वीकारली. त्यामुळे लाचखोर बहिरम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक (संपर्क क्रमांक – 8605111234)
सह् सापळा अधिकारी
स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
पो. ना. गणेश निबाळकर,
पो. ना. प्रकाश महाजन,
पो. शि. नितीन नेटारे.

मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक संपर्क क्रमांक – +919371957391
मा. श्री. माधव रेड्डी* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक. संपर्क क्रमांक – 9404333049
मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. संपर्क क्रमांक – +917977847637

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.