loader image
[ays_poll id=7]

दरेगाव येथे मोराला जीवदान

Aug 6, 2023

गोरक्षनाथ लाड
दरेगाव- चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विहिरीत पडलेल्या जखमी मोराला शेतकरी व ग्रामस्थांनी जीवदान देऊन पुढील प्रथमोपचार करण्यासाठी वनविभाग यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले.
दरेगाव गावालगत बंधार्या जवळ दादाजी निवृती गांगुर्डे यांच्या शेतातील विहिरीजवळ सायंकाळच्या सुमारास अन्न पाण्याच्या शोधात असताना मोर विहीरीच्या कठड्या वरून जात असताना विहिरीत पडला.हे दृश्य विहिरीच्या थोड्या अंतरावरून शेतात जात असताना येथील शेतकरी विष्णू जाधव यांनी पाहिले.मोर विहिरीच्या बाहेर का येईना म्हणून विहिरीवर जाउन पाहिले असता मोर विहिरीच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले.जाधव यांनी उशीर न करता विहीर मालक दादाजी निवृती गांगुर्डे यांना ही हकीगत सांगितली. फोन करून आजुबाजुचे शेतकरी व ग्रामस्थांनी मोराला बाहेर काढण्यासाठी धावून आले.यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी मोर बाहेर काढण्याचे शर्यतीचे प्रयत्न करीत होते. मात्र विहीर 50 फुट खोल व पाणी असल्यामुळे तसेच अंधार पडू लागल्यानै मोराला बाहेर काढणे अवघड झाले होते.
यावेळी येथील तरूण वसंत आहिरे हे विहिरीत उतरून मोराला सुखरूप बाहेर काढले.यावेळी विष्णू जाधव,जालिंदर गांगुर्डे,भावराव गांगुड,समाधान आहेर रवींद आहेर,सिताराम आहिरे,आकाश आहिरे हे याप्रसंगी मदतीसाठी धावून आले.मोराला बाहेर काढताच मोर गारठून गेला होता.व जखमी असल्याने मोर चालण्याच्या स्थितींत नसल्यामुळे वसंत आहिरे यांनी मोराला आपल्या घरी जाऊन सुखरूप ठेवले.सकाळी मोराला सोडण्यासाठी गेले.असता त्याला चालता येईना.यावेळी वसंत आहिरे यानी वनविभाग यांना फोन व्दारे घटनेची माहिती दिली.
वनपरिक्षक अधिकारी संजय वाघमारे,वनपरिमंडळ अधिकारी प्रकाश सोमवंशी,यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी पुनम साळवे,वनमजुर नामदेव पवार,वाहन चालक अशोक शिदे यांनी दरेगाव येथे तात्काळ भेट देऊन पुढील प्रथमोपचार करण्यासाठी चांदवड येथील कार्यालयात नेण्यात आले. यावेळी काळू आहिरे,वसंत आहिरे,मगेश आहिरे,सोमनाथ आहिरे,चैतन्य आहिरे,केदराज आहिरे आदिसह उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.