मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका व उपशिक्षिका शीतल आहेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रुपाली मॅडम यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच सोनाली मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रियांका मॅडम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
इंफाळ मणिपूर येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात १६८...










