loader image
[ays_poll id=7]

बिगरसिंचनाचे आरक्षित पाणी लवकरात लवकर सोडावे – आमदार कांदे यांची मागणी

Aug 8, 2023

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार कांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
पत्राचा आशय असा नांदगांव मतदार संघातील मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण व परिसरात नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यमान होत नसल्यामुळे मनमाड शहराचा पाणी पुरवठा हा नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यात दर वर्षी सुमारे ३५५ द.ल.घ.फुट बिगरसिंचन पाण्याचे कायम स्वरूपी आरक्षण असलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. यापूर्वी देखील डाव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या बिगरसिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून मनमाड शहराला २० ते २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वागदर्डी धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतेकाच पाणी साठा असल्याने शहराला पाणी टंचाई निर्माण होवू नये याकरिता वागदर्डी धरणात आवर्तन ‘सोडण्यासाठी मा. कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांना पत्र क्र. १७९९/२०२३ दि. २१/०७/२०२३ आणि जा.क्र.१८८९/ २०२३ दि. ३१/०७/२०२३ द्वारे कळविण्यात आले आहे. परंतु बिगरसिंचनाचे आवर्तनाचे पाणी माहे ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याचे संकेत मिळत असल्याने मनमाड शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आरक्षित केलेले बिगरसिंचन पाण्याचे आवर्तनाचे पाणी लवकरात लवकर सोडण्यासाठी संबंधितांना आदेश करण्यात यावे अशी विनंती आमदार कांदे यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
.