चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सदर रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा समोरासमोर वाहने आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन जो पर्यंत हा रस्ता मोजुन मोकळा करुन देत नाही तोपर्यंत रायपूर येथील ग्रामस्थांनी रस्ता खोदून बंद केलेला असून तो रस्ता मोजुन दिल्या शिवाय सर्व शेतकरी व शाळेतील मुले रस्ता रोको आंदोलन करत आहे. हनुमानवाडी व वडगाव चव्हाण वस्तीचा जो पर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी रस्ता बंद करून आंदोलन करत आहेत.
श्रीराम गुंजाळ,
बाळु विठ्ठल चव्हाण,अनिल गंगाधर गुंजाळ उपसरपंच रायपुर यांनी प्रशासनाकडे सदरील रस्त्याची मोजणी करून झालेले अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी केली आहे.