loader image
[ays_poll id=7]

मनमाड करांना दिलासा,पालखेडचे आवर्तन सुटले – मात्र पावसाची प्रतीक्षा कायम

Aug 11, 2023


मनमाड शहरावर उदभवलेले पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले असून पाटोदा येथील साठवण तलावात पाणी घेतले जाणार आहे. धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. आवर्तनाचे पाणी सुटल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. हे पाणी वागदर्डी धरणात पोहचल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होणार आहे.

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. परिसरात चांगला पाऊस झाला नसल्यामुळे धरण भरू शकले नाही. त्यामुळे साठा संपुष्टात आल्याने पाण्याने तळ गाठला होता. मृत साठाच शिल्लक असल्याने आहे त्या पाण्यात पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या शहराला २० ते २२ दिवसाआड अर्थात महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट ओढवले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. तरी दमदार पाऊस झाला नाही. आजही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणात पाणी नसल्याने शहराला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता. पालखेड धरणात आरक्षित असलेल्या पाण्याच्या आवर्तनची अत्यंत गरज होती. पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिले तसेच आमदार सुहास कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी आज पोचले असून पुढे येवल्यासाठी ते सोडण्यात आले आहे. उद्या सकाळनंतर ते पाटोदा येथील साठवण तलावात घेतले जाणार आहे. पाटोदा येथील साठवण तलावात तीन दिवसात या अवर्तनाचे पाणी १५ एमसीएफटी मिळणार आहे. तेथून ते वागदर्डी धरणात पंपिंग केल्यानंतर त्याचा शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र वागदर्डी धरणाची क्षमता ११० एमसीएफटी असल्यामुळे पाण्याचे नियोजन करणे मोठ्या अडचणीचे ठरणार आहे. हे पाणी २ महिने पुरण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे असणार असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दमदार पाऊस झाल्यास पाणीसंकट जाणवणार नाही. मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल, पाणीपुरवठा अधिकारी अमृत काजवे यांनी पाटोदा साठवण तलावावर भेट देऊन पहाणी केली तेथील कर्मचाऱ्यांना  सुचना दिल्या.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.