loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट क्लिनिक सुरू

Aug 11, 2023


नाशिक, दि. ११ ऑगस्ट : उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलची बांधिलकी जपवून या अत्याधुनिक लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण क्लिनिकची सुरवात करण्यात आली आहे. या क्लिनिक मध्ये यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक आणि विशेष काळजी प्रदान करणे, अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आणणे हे या क्लिनिकचे उद्दिष्ट आहे.

मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख या प्रसंगी म्हणाले , ” लिव्हर आणि किडनी ट्रांसप्लांट क्लिनिक सुरु करणे हे आमच्या रुग्णालयाच्या क्षमतांमध्ये मोठी प्रगती दर्शवते. आम्ही आता प्रत्यारोपणची गरज असणाऱ्या रूग्णांसाठी अत्याधुनिक उपचार आणि सुविधा देण्यासाठी सज्ज आहोत. यकृत आणि किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, त्यांना नाशिकमध्येच शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळेल.”

यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, डॉ विक्रम राउत म्हणाले, “या उपक्रमाचा एक भाग होण्याचा मला सन्मान वाटतो. आमची टीम जागतिक दर्जाच्या यकृत प्रत्यारोपण सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. यकृताच्या आजार असलेल्या रुग्णांना उच्च स्तरावरील काळजी प्रदान करण्यासाठी आम्ही आमचा अनुभव, नावीन्य या जोडीने आधुनिक तंत्रच्या साह्याने आणि अनुभवी व कुशल डॉक्टरांची टीम यकृत रोग असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्रत्यारोपणाचे यशस्वी परिणाम आणि आमच्या रुग्णांचे जीवनमान सुधारणे हेच आमचे ध्येय आहे.

फोटो कॅप्शन : डॉ सुशील पारख , डॉ विक्रम राऊत , डॉ संदीप सबनीस , डॉ तुषार संकलेचा,डॉ विपुल गट्टानी, डॉ श्याम तलरेज, डॉ. सौरभ नागर.

डॉ.संदीप सबनीस, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मधील तज्ञ, क्लिनिकच्या सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत म्हणाले, “आमचे क्लिनिक प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेच्या पलीकडे जाते. आम्ही प्रत्यारोपणापूर्वीचे मूल्यांकन, शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि दीर्घकालीन रूग्णांचे आरोग्य यावर लक्ष केंद्रित करतो.”

उपस्थित पत्रकार , रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे आभार व्यक्त करताना रिजनल हेड समीर तुळजापूरकर म्हणाले कि , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वछता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची हि काळजी घेतली जाते . सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता हि सुविधा नाशिक मधेच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे .अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असतो.

या प्रसंगी कुशल व अनुभवी तज्ज्ञांची टीम गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ तुषार संकलेचा, नेफ्रोलॉजिस्ट डॉ विपुल गट्टानी , यूरोलॉजिस्ट डॉ श्याम तलरेज, यांच्या सह ,केंद्र प्रमुख डॉ. सौरभ नागर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर, लिव्हर आणि किडनी ट्रांसप्लांट कोडीनेटर सुरेंद्र तेलंगे , रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी आदी या पत्रकार परिषेदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
.