चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित (स्व.) सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागात शिकणाऱ्या गीतिका बन्सल हिची इन्फोसीस या प्रतिष्ठीत आयटी कंपनीत निवड झाली. तिला नऊ लाख ५० हजार रुपयाचे वार्षिक पॅकेज कंपनीकडुन मिळाले आहे.
इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्यात नुसते पुस्तकी ज्ञान असणे पुरेसे नाही. याकरिता कंपन्यांमध्ये सध्या वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी
माहिती असणे व असे तंत्रज्ञान शिकणे ही काळाची गरज असून त्याच संधीचा फायदा घेत गितीका बंसल हिने हे यशाचे शिखर गाठले आहे. गीतिकाच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे
अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, अरविंदकुमार भन्साळी, झुंबरलाल भंडारी व
सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. आर. जी. तेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. संघवी, डॉ. पी. ए. कापसे व प्रा. जी.पी. ढोमसे आदींनी अभिनंदन केले. द