loader image

हिसवळ खुर्द च्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Aug 14, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांच्या विरोधात आज दि .१४ ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.
आज नांदगाव येथील नायब तहसिलदार.चेतन कोतकर यांच्या उपस्थितीत हिसवळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या म्हणजे एकूण सदस्य संख्या ९ आहे त्यापैकी ८ सदस्य उपस्थित होते. एक सदस्य नवनाथ विलास आहेर गैरहजर होते. उपस्थित आठ सदस्यां पैकी ७ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात उंचावून आपला कौल दिल्याने बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पद अनुसूचित जातीच्या जागेसाठी आरक्षित झाल्यानंतर या जागेवर विजयी झालेले श्री. कैलास खंडू फुलमाळी हे एकमेव सदस्य असल्याने त्यांची सरपंच पदासाठी निवड झाली होती. गेले अडीच वर्ष झाल्यानंतरही ते इतर सदस्यांना विश्वासात घेत नव्हते त्यामुळे गावाच्या विकासही थांबला होता अनेक वेळा तोंडी समजावून देखील त्यांनी सदस्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सर्व सदस्यांनी नांदगावचे तहसीलदार डॉ . सिद्धार्थ मोरे यांचे कडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर आज हिसवळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावावर चर्चा विनिमय करण्यासाठी विषेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच संजय आहेर, सदस्य- नानासाहेब आहेर, बेबीताई कदम, वैशाली संतोष आहेर, मनिषा सुदाम आहेर, ललिता संदिप आहेर, सरस्वती शांताराम लोखंडे व ग्रामसेवक मनिष भाबड तलाठी ननाई, सुनील आसने उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठराव सर्वांनुमते मंजूर झाल्याने सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांना पदावरून पाय उतार करण्यात आले आहे. अडीच वर्षापुर्वी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे नेतृत्वा खाली येथे सर्व पॅनल विजयी झाले होते. अनेक विकासाची काम करण्याची संधी असूनही सरपंचांच्या या आडमोठेपणाच्या धोरणामुळे गावातील विकासावर परिणाम झाला होता. विकासाला अडचण येत असल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे स‌र्व सात सदस्यांनी यांनी सांगितले. उपसरपंच संजय आहेर यांचे कडे पुढील कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार चेतन कोतकर यांनी सांगितले आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.