loader image
[ays_poll id=7]

हिसवळ खुर्द च्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Aug 14, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांच्या विरोधात आज दि .१४ ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.
आज नांदगाव येथील नायब तहसिलदार.चेतन कोतकर यांच्या उपस्थितीत हिसवळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या म्हणजे एकूण सदस्य संख्या ९ आहे त्यापैकी ८ सदस्य उपस्थित होते. एक सदस्य नवनाथ विलास आहेर गैरहजर होते. उपस्थित आठ सदस्यां पैकी ७ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने हात उंचावून आपला कौल दिल्याने बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पद अनुसूचित जातीच्या जागेसाठी आरक्षित झाल्यानंतर या जागेवर विजयी झालेले श्री. कैलास खंडू फुलमाळी हे एकमेव सदस्य असल्याने त्यांची सरपंच पदासाठी निवड झाली होती. गेले अडीच वर्ष झाल्यानंतरही ते इतर सदस्यांना विश्वासात घेत नव्हते त्यामुळे गावाच्या विकासही थांबला होता अनेक वेळा तोंडी समजावून देखील त्यांनी सदस्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सर्व सदस्यांनी नांदगावचे तहसीलदार डॉ . सिद्धार्थ मोरे यांचे कडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर आज हिसवळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास प्रस्तावावर चर्चा विनिमय करण्यासाठी विषेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच संजय आहेर, सदस्य- नानासाहेब आहेर, बेबीताई कदम, वैशाली संतोष आहेर, मनिषा सुदाम आहेर, ललिता संदिप आहेर, सरस्वती शांताराम लोखंडे व ग्रामसेवक मनिष भाबड तलाठी ननाई, सुनील आसने उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठराव सर्वांनुमते मंजूर झाल्याने सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांना पदावरून पाय उतार करण्यात आले आहे. अडीच वर्षापुर्वी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे नेतृत्वा खाली येथे सर्व पॅनल विजयी झाले होते. अनेक विकासाची काम करण्याची संधी असूनही सरपंचांच्या या आडमोठेपणाच्या धोरणामुळे गावातील विकासावर परिणाम झाला होता. विकासाला अडचण येत असल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे स‌र्व सात सदस्यांनी यांनी सांगितले. उपसरपंच संजय आहेर यांचे कडे पुढील कार्यभार सोपविण्यात येत असल्याचे नायब तहसीलदार चेतन कोतकर यांनी सांगितले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
.