loader image

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा या मागणीसाठी उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नांदगाव तहसिलदार यांना निवेदन

Aug 14, 2023


नांदगांव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील शेतकरी,नागरिक,कामगार इतर घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यासह विविध मागणीचे निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने प्रशासन नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पेरणी केलेले पिके येऊ शकले नाही. सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,
तालुक्यातील त्या गावांमध्ये तात्काळ पाणी पुरवठा करावा,
शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीजबिल माफ करावे, तालुक्यातील
शेतकऱ्यांचे कांद्याचे अनुदान सरसकट खात्यात जमा करावे,
शेतकऱ्यांचे पिक विमाची रक्कम तात्काळ मिळावी ,तालुक्यातील २००
शिक्षकांचे तात्काळ  रिक्तपदे  भरण्यात यावे,तालुका कृषी
कार्यालयातील 20अधिकारी/कर्मचारी पदे तात्काळ भरण्यात
यावे, तहसील कार्यालयातील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावे,
तसेच नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा
अशी मागणी निवेदनात केली आहे..
यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,संतोष बळींद,
तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,संतोष जगताप,शशिकांत मोरे, सुनील पाटील,संजय कटारिया, सनी फसाटे श्रावण आढाव,दिलीप नंद ,श्रावण चोळके, अँड.सुधाकर मोरे,अशीष घुगे, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
.