loader image

न्यू इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र दिन साजरा

Aug 15, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इंग्लिश स्कूल विद्यालयात न्यू इंग्लिश स्कूल , औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण आदर्श प्राथमिक शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट गाईडच्या ध्वजाचे ध्वजारोहण न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे यांनी केले. संगीत शिक्षिका श्रीम कल्पना अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या गितमंचने राष्ट्रगीत, राज्यगीत , ध्वजगीत व देशभक्तीपर समूहगीत सादर करण्यात आली. स्काऊट गाईड पथकाने संचालन करत मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. लेझिम पथकाने विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली . सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. एस. फणसे यांनी सूत्रसंचालन केले. आय टी आयचे प्राचार्य बी .बी. आथरे , आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक के. के .तांदळे ,पर्यवेक्षक टी. एम. घुगे , विजय काकळीज, पुंजाराम जाधव, वसंतराव कवडे,राजेश पाटील,शरद पगार,बाळू कदम, अभय देशमुख ,आबासाहेब सोमवंशी, सुनील बोरसे, दशरथ आरोटे, किरण काळे ,अरविंद बोरसे , एकनाथ तांबे , नेमिनाथ चोळके, विठ्ठल आहेर ,वसंत लोखंडे यांच्यासह शिक्षक पालक ,मातापालक ,म. वि. प्र. सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक बी. एम. आहेर यांच्यासह शिक्षक , कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.