loader image

कातरवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

Aug 16, 2023


मौजे कातरवाडीराणमळा तालुका चांदवड येथील शिवारात मद्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका घोडा ठार झाला हि माहिती बापू साहेबराव गुंजाळ राणमळा गट नंबर 250 चा 4 मध्ये घडली अशी सूचना अंकुश गुंजाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत झाल्टे यांना फोन वरून माहिती दिली झाल्टे यांनी त्वरित भेट देऊन पाहणी केली व परिसरातील ग्रामस्थानां सावधानतेचा इशारा दिला व वनविभागाने पिंजरा लावून लवकरात लवकर बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून पिंजरा लावून जेरबंद करावे अशी माहिती वनविभाग अधिकारी RFO श्री अक्षय म्हेत्रे साहेब येवला व वनरक्षक मॅडम सोनाली वाघ यांना श्री भागवत झाल्टे यांना फोन करुन माहिती दिली व साहेबांनी त्वरित दखल घेऊन पिंजरा लावण्यात आला. डोंगराळ भाग असल्याने सर्व शेतकरी वर्ग शाळकरी लहान मुलांनीं काळजी घ्यावी या अगोदर परिसरात शेळ्या गाई व पाळीव प्राणी यावर
ठिक ठिकाणी कातरवाडी ,विसापूर अंकाई ,कातरणी, वडगांव पंगु या परीसरात हल्ला करून बिबट्या धुमाकूळ घातला आहे अशी माहिती समाजसेवक श्री भागवत झाल्टे यांनी दिली त्यावेळी वन कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झाल्टे संजय गुंजाळ व बापू गुंजाळ व समस्त गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते .16 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे

 

 


अजून बातम्या वाचा..

.