loader image

मनमाड शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Aug 17, 2023


योगेश म्हस्के

मनमाड : स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

15 ऑगस्ट हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

यंदाच्या वर्षी भारत देश आपला 76 वा दिवस साजरा करत आहे.मनमाड शहरातील पोलीस स्टेशन , मनमाड न्यायालय , मनमाड नगर परिषद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण , महर्षी वाल्मिकी क्रीडांगण , सी.आर.एम.एस.कार्यालय , ऑल इंडिया एस.सी.एस. टी रेल्वे एम्प्लॉ.कार्यालय , सर्व सरकारी कार्यालये , शहरातील सर्व शाळा , महाविद्यालय , येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील अनेक सामाजिक आणि राजकीय संस्था , संघटना यांच्याद्वारे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


अजून बातम्या वाचा..

.