loader image

क्रांतिवीर वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत मकवाना यांच्या हस्ते ध्वजारोहण

Aug 17, 2023


मनमाड- बुधलवाडी भागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर नगर परिषद शाळा क्र. ११ मध्ये भारतीय स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला. राज्य प्रादेशिक परिवहन मंडळाचे नुतन अधिकारी चुनिलाल मकवान यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विजया सुभाष चकोर, माजी नगरसेवक बंडूनाना सांगळे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी ध्वजगीत सांस्कृतिक ,भाषणे व देशभक्तीपर सादर केले तर दहावीच्या परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या माजी विद्यार्थी वेदांत
योगेश सांगळे, चैतन्य योगेश सांगळे,श्रध्दा महेश सांगळे, श्रावणी लक्ष्मण काळे यांचा गौरव करण्यात आला. शासनाच्या स्पर्धा परिक्षा देउन शासकिय सेवेत विविध पदावर पोहचलेले मोहित चुनिलाल मकवान यांची (आर टि ओ), पोलीस निरीक्षक उन्नती राजू नागरे तसेच कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या ओम सचिन कांदे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेच्या सेवानिवृत्त माजी शिक्षिका श्रीमती चकोर यांची मुलगी तृष्णा चकोर हिच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप केले. सर्वश्री अशोक सानप, राजेंद्र पवार,उगले सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिष सांगळे, राजेंद्र कराड, योगेश म्हस्के, गणेश सांगळे ,सौ.सुरेखा सगळे ,सौ.दयाश्री काळे,धनंजय सांगळे, विनोद सांगळे, राजेंद्र जाधव श्री. विनोद बोडखे, सुमेध आहिरे, रामदास सांगळे, अरूण घुगे, तुषार सांगळे, बाळू सानप ,आकाश सानप,सचिन कांदे, योगेश सांगळे,संतोष
सांगळे, राजू सांगळे, माणिक दरगुडे आदी नागरिक उपस्थित होते., प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश गोरे, सहशिक्षक नितीन कोल्हे
सौ. वंदना साखरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकवृदांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

.