loader image
[ays_poll id=7]

सिद्धी क्लासेस गुणगौरव 2023 नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

Aug 18, 2023


शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा २०२३, १५ ऑगस्ट रोजी दुपारी हिरा लॉन्स येथे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी क्लासेसच्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्लासेस तर्फे करण्यात आला.याप्रसंगी सन्माननीय सौ.अंजुम ताई कांदे( समता ब्लड बँक, संचालिका नाशिक, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नांदगाव विधानसभा)
सन्माननीय श्री योगेश (बबलू) पाटील( मा. नगराध्यक्ष मनमाड )
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवकी हॉस्पिटलच्या संचालिका
माननीय डॉ. पूनम रवींद्र राजपूत, मनमाडच्या विद्यमान नगरसेविका माननीय सौ.सविताताई साईनाथ गडगे
मा. नगरसेवक बंडू नाना सांगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सन्माननीय आमदार श्री.सुहासअण्णा कांदेच्या प्रयत्नाने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी पुरवठा योजना मनमाड मध्ये पूर्णत्वास येत असल्याने सिद्धी क्लासेस च्या वतीने सन्माननीय आमदार श्री.सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांचा सत्कार क्लासेसचे संचालक श्री. डॉ. भागवत दराडे व सौ भाग्यश्री दराडे यांनी केला. सन्माननीय आमदार श्री.सुहासअण्णा कांदे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्न पूर्ण केले पाहिजे. तसेच मुलींनी चुलमुल इतकेच न राहता विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे. असे आपल्या भाषणात सांगितले. तसेच क्लासेसच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनमाड केंद्रातून प्रथम आलेल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा तसेच क्लासेसच्या सर्व शिक्षकांचा सत्कार सन्माननीय आमदार श्री.सुहासअण्णा कांदे व अंजुम ताई कांदे यांनी केला.
तसेच प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ पूनम रवींद्र राजपूत यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले,
उपस्थीत प्रमुख अतिथी सौ सविताताई साईनाथ गिडगे व श्री योगेश पाटील यांनी क्लासेसला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याचे स्वागत क्लासेस चे गणित विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सानप सर यांनी केले तसेच प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक राहुल गुंडगळ सर व प्रा. मयूर आहेर सर यांनी करून दिला, आभार प्रदर्शन क्लासेसच्या संचालिका प्रा.सौ भाग्यश्री भागवत दराडे यांनी केले.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी क्लासेसचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली .


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.