loader image

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आ. सुहास कांदे यांची आढावा बैठक

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.

पावसाळ्यातील अडीच महिने उलटून गेले तरीही तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नसुन शेतकरी राजा पावसाकडे आस लावून बसला आहे. अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावें लागू शकते या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आज आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव येथे शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय सर्व विभागांच्या मुख्य अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.नांदगांव तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असून खरीपाची पिके पूर्णपणे करपली आहे ,जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुहास कांदे होते.
या वेळी टंचाई आढावा बैठकीत पिण्याचे पाणी, पिक आणेवारी ,जनावरांचा चारा,मजुरांना कामे या विषयांना प्राधान्य देण्यात आले .यावेळी विविध विभागाचा आढावा घेण्यात आला.
मक्याचे पिक व खरीपाची जिराईत पिके जळत आहे , मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता दिसत आहे. नांदगांव ना पा ने पिण्याचे नियोजन केले असून शहराला पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे मुख्याधिकारी धांडे यांनी सांगितले तसेच नांदगांव
न . पा . च्या मालकीचे दहेगांव धरण ,गिरणाडॅम ‘ माणीकपुंज प्रकल्प या धरणातुन न पा ला पाणी मिळते रोज २५ लाख लिटर पाण्याची गरज असते. छप्पन खेडी पाणीपुरवठा योजना मधून मिळणारा पाणीपुरवठा हा नेहमी विविध कारणांनी विस्कळीत होत असतो ही योजना कालवाह्य झाल्यामुळे यावर करण्यात येणारा खर्च कोणी करायचा यावरून नेहमीच विसंवाद होत असतो त्यामुळे अशा परिस्थितीत शहरासाठी मंजूर झालेली नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत या योजनेच्या देखभालीसाठी होणारा खर्च डीपीडीसी मधून मंजूर करून देण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले. ‌
पाणी टंचाई संदर्भात तालुक्यात
बारा गावांमध्ये २८ फेऱ्या चालू आहे त्या वाढविण्याची मागणी उपसरपंच संजय आहेर यांनी केली. तालुक्यात पाऊस पडला तरी चारा व पाणी टंचाई जानवेल या साठी नियोजन हवे. सदर आढावा बैठक
हि फक्त कागदावर राहणार नसून या बैठकिचे सविस्तर टिपन विवरण शासनाला देण्यात येणार आहे.हि बैठक कोणत्याही पक्षाची नाही असे आमदार कांदे यांनी स्पष्ट केले.
धरण क्षेञातील पाणी टंचाईवर अधिक भर देण्यात आला शिवाय
नाग्यासाक्या धरणातील पाणी संगोपन व्हावे,सध्या ९८.६० % पाणी मृत साठ शिल्लक आहे या वर्षात एकही थेंब धरणात पडला नाही तीच आवस्था माणीकपुंज व गिरणा धरणाची झाली आहे कोणत्याच धरणात पाणी साठा वाढला नाही. यावेळी
शेती साठी पाणी उपसा थांबवावा अशी सुचना करण्यात आली ,माणीकपुंज येथील
धरणातील जिवंत साठा संपला असून मृतसाठा वापरला जातो.
पिण्याचे पाणी आवश्यक आहे. शेतकर्यांनी धरणातील मोटारी काढून घ्याव्यात असे आवाहन आ. कांदे यांनी बैठकीत केले. या संदर्भातले अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहे .जोपर्यंत धरण भरत नाही तो पर्यंत पाणी उचलू नये. परंतु या दरम्यान शेतकर्याना वेठीस धरु नये अशा सूचना आमदारांनी केल्या. तालुक्यात कृषी विभागाचे आठ मडंळे असून नांदगाव ‘ मनमाड ‘ हिसवळ या तीन मडंळाची परिस्थीती खुपच भयावहक आहे. तालुक्यात खरीपाच्या ९८% पेरण्या झाल्या पिकांची आवस्था अतिशय नाजुक आहे उत्पन्न ५०% पेक्षा कमी येणार आहे. पिकविमा योजना चे लाभ शेतर्याना मिळेल, यात दुष्काळी २५% रक्कम विमा कंपनी कडुन मिळू शकते.अशी माहिती कृषी विभागा कडुन देण्यात आली . तालुक्यात
पिकविमा काढलेल्यांची संख्या २८७८४ आहे .

बाळासाहेबाचा दवाखाना या नावाने तालुक्यात ८ दवाखाने मंजूर असून नांदगांव. साठी ३ व मनमाड साठी ५ नागरी दवाखाने मंजूर झाले असून . दवाखान्या संदर्भात आजुन काही जागा निश्चित होणार आहे .
नांदगांव २ मनमाड साठी ३ जागा अजून मिळाल्या नाही. बाळासहेबांचा दवाखान्यात चांगली व्यवस्था आहे येथे mbbs. डाॅक्टर येथे असतील
ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र आणी ग्रामीण रुग्नालय येथे हि आरोग्य व्यवस्था आहे अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली
जनावराच्या चाऱ्याचे १५ दिवसात नियोजन करुन. कृषि विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्याना पाठवण्यात येतील. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या
मराठी शाळेला पाणीवॉटर फिल्टर देऊ असे आश्वासन आ कांदे यांनी बैठकित दिले.
प्रत्येक नागरिकाला केवायसी संदर्भात ग्रामसेवकाने सुचना कराव्यात, ग्रामपंचायत पातळीवर हे काम होईल .
सर्वानी एकञीत काम करणे गरजेचे आहे सर्वांचे संपर्कात रहावे अशी सुचना तहसीलदार डॉ सिद्वार्थ मोरे यांनी केली.
या प्रसंगी तहसीलदार, बिडीओ, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, महावितरण, भूमी अभिलेख, इरिगेशनचे, पंचायत समिती, तहसील, बांधकाम विभाग, नगरपालिका,उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी प्रमोद भाबड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

आमदार सुहास कांदे यांची बैठक म्हटली की ती नेहमीच वादळी ठरत असते नुकत्याच नाशिक येथे झालेल्या बैठकीत देखील एका अधिकाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने त्या अधिकाऱ्याला भोवळ आली होती .योगायोगाने नांदगाव येथे देखील या बैठकीदरम्यान भूमी अभिलेखच्या उपअधिक्षक श्रीमती योजना अकोलकर यांना बैठक सुरू असतानाच अचानक भोवळ आली यामुळे आमदारांनी स्मित हास्य करत त्यांना कशामुळे भोवळ आली असेल अशा प्रश्न उपस्थित केला. व त्यांना विश्रांतीसाठी विश्रामगृहात नेण्याची डॉक्टरांना विनंती केली.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.