loader image

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कंटेनर सह गोवा बनावटीचा १ कोटीचा मद्य साठा जप्त

Aug 22, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेला गोवा निर्मिती विदेशी मध्याचा वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला पाठलाग करून एक कोटी नऊ लाख 53 हजार मुद्देमाल विंचूर तालुका निफाड येथे ताब्यात घेतला या कंटेनर मध्ये गोवा बनावटीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले अकराशे बॉक्स आढळून आले आहेत संशयित कैलास पांडू लष्कर वय 33 रा. धुळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपाआयुक्त डॉ.बी.एच.तडवी, नाशिक अधिक्षक शशिकांत गर्जे,उप अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे,दुय्यम निरीक्षक संजय वाघचौरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, शिपाई अवधूत पाटील, संतोष मुंढे, विठ्ठल हाके,अमन तडवी,मुकेश निंबकर, यांनी ही कारवाई केली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय वाघचौरे हे करीत आहेत. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

.