loader image

कासलीवाल विद्यालयातील मुलींची राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड

Aug 23, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील रोशनी शिंदे, मेघा जगधणे, गार्गी पाटील, सायली शिंदे, प्रेरणा राऊत, खुशबू बाविस्कर या विद्यार्थीनींची राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नांदगाव येथील निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत या विद्यार्थीनींनी हे यश‌ मिळविले. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा देवगाव प्रवरा येथे 2 व 3 सप्टेंबर रोजी
पार पडणार आहे .
या विद्यार्थ्यांनीनी उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा प्रशासन अधिकारी गुप्ता सर‌ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, गोरख डफाळ यांनी देखील या विद्यार्थ्यांनींचे
अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांनीना क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन , अशोक बागुल यांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.