loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा – शिवसेना (उबाठा) गटाची मागणी

Aug 25, 2023

नांदगांव तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नांदगांव तालुक्यात हवा तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगांव तालुक्यात
दुष्काळाची गंभिर स्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकांना याचा
खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मुख्यतः शेतकऱ्यांचे यामध्ये खुप मोठे नुकसान झालेले आहे व होत आहे. तरी

या बाबींचा विचार करता नांदगांव तालुक्यात त्वरीत दुष्काळ जाहिर करावा अशी शासनाकडे त्वरीत मागणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मोरेंकडे करण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील शेतकरी, नागरीक, कामगार व इतर घटकाचे विविध मागण्या देखिल लवकरात
लवकर पूर्ण करणेकामी शासन स्तरावरून योग्यती कार्यवाही करावी व याबाबत शासनास अवगत करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळाचे गंभिर समस्येमुळे शेतकऱ्यांनी पेरलेले पिक येऊ शकलेले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसाणीची नुकसान भरपाई मिळावी.
अनेक गावांमध्ये पिण्याचे पाण्याची गंभिर समस्या उद्भवत आहे, त्या गावांना तात्काळ टैंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा.
दुष्काळामुळे जनावरांचे देखिल चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जनावरांसाठी तालुक्यात ठिक-ठिकाणी चारा छावण्या सुरु करणेत याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

येथील के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालदिन...

read more
मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

  मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई...

read more
हर्षाली मिस्कर आणि सम्यक बागुल यांनी पटकावले कांस्य पदक – ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धा

.