सलग दोन जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक राष्ट्रीय युथ व खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आकांक्षा ने तिला मिळालेल्या रोख बक्षीसांच्या रकमेतून जय भवानी व्यायामशाळेतील खेळाडूना ४१हजार रुपयांचे वेटलिफ्टिंग साहित्य भेट देवून खेळाडूंप्रती व व्यायामशाळेविषयी ऋण व्यक्त केले आकांक्षा ची आई हेमा वडील किशोर व्यवहारे यांनी आज ही अनोखी भेट खेळाडूना अर्पण केली
जय भवानी व्यायामशाळेतील सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची शपथ घेतली
याप्रसंगी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर व सर्व खेळाडू उपस्थित होते
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...









