loader image

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Aug 30, 2023


मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नांदगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील गटात कु. ओम नागरे आणि कु प्रिया गायकवाड हिने विजय संपादन केला. मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, पर्यवेक्षक प्रा. आर. एस. शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.ज्योती पालवे, पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड,क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.