नांदगांव तालुक्यातील बोलठाण मार्गावरील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या चांदेश्वरी नजीक प्राचीन हनुमान मंदिर येथे दर वर्षी श्रावण महिण्यात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.या प्रसंगी येथे शेकडो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात या प्रसंगी स्थानिक तांड्यावरील व धनगर वाड्यावरील अनेक महिला व नागरिकांनी या प्रसंगी आनंदाने प्रसादाचा लाभ मोठ्या संख्येनी घेतला.नांदगांव येथील राजू शेख व श्रीधर बोरसे,राजेंद्र जाधव यांच्या परीवाराकडुन
गत पाच वर्षा पासून अन्नदान करण्याचे काम सुरु आहे .
चांदेश्वरी देवस्थानाला नजीक असलेल्या हनुमान मंदिर येथे जंगलात महाप्रसाद तथा वन भोजनाचे आयोजन केले होते. २९ ऑगस्ट मंगळवार रोजी हा विशाल भंडारा संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी विविध क्षेञातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते. या प्रसंगी ह भ प तुकाराम महाराज जेऊरकर व स्थानीक साधू महाराजांनी उपस्थीताना जीवनातील घडमोडी व सुख दु:ख या विषयावर समर्थपणे सामोरे जाण्याचे प्रबोधन केले. कार्यक्रमाला फिरोज इनामदार, आंबदास कचबे,इरफान शेख, संतोष पवार, नाना गेजगे,लक्ष्मण गेजगे, जितू आहेर,शिवा काकलिज, गणेश येडवे, गणेश जाधव, महेश चौगुले, दीपक जाधव, आर्जून गवळी, हरिभाऊ कसाब खेडा, पिणू भालके,साई सोनवणे, कृष्णा गेजगे, प्रसाद सोनवणे आदी उपस्थित होते.















