मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित जिल्ह्यातील निमंत्रित संघाच्या भव्य जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी संत झेवियर्स हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन फादर लॉईड हे करणार आहेत या स्पर्धेत प्रथम पारितोषिक(५००१ )श्री प्रशांत बनसोडे यांच्यामार्फत दिले जाणार आहे. स्वर्गीय निलेश शिंपी यांच्या स्मरणार्थ मित्रपरिवारा तर्फे(३००१) देण्यात येणार आहे .तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री. मुकुंद झाल्टे यांच्यातर्फे१००१) देण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्वर्गवासी आनंदीबाई सुमंतराव दोंदे यांच्या स्मरणार्थ श्री दिवाकर दोंदे यांच्याकडून चषके देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट शूटर व उत्कृष्ट ऑल राऊंडर पारितोषिके श्री. परविंदरसिंग रिसम यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत झेवियर स्पोर्टसच्या संघातील प्रत्येक खेळाडूला झेवियर्स स्पोर्ट्स क्लब (सीनियर) मुलांकडून स्पोर्ट्स किट देण्यात आली आहे. या स्पर्धेला संत झेवियर विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सर्वश्री दिवाकर दोंदे,अनिल निकाळे, सुधाकर कातकडे , दत्तू जाधव, स्वप्निल बाकळे, तेजस अमोलिक, महेश पाथरकर, लक्ष्मीकांत दरवडे, परविंदर सिंग रिसम, सीमोन स्वामी, रितेश माळी, करण गरुड व झेवियर स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य आदी विशेष परिश्रम घेतले.
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...












