loader image

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

Sep 5, 2023


दिनांक .5 सप्टेंबर रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला. या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. तो अत्यंत नेटकेपणाने पार पडला . शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज त्यादिवशी विद्यार्थ्यांनी सांभाळले. शाळेच्या प्रांगणात समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी यश शिंदे व अनुष्का पगार यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य श्री मणी चावला यानी स्व.किशोर बागले सर यांच्या आठवणींना शब्दसुमनानी उजाळा दिला. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा.श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये ओळखा पाहू , संगीत खुर्ची,पेपर डान्स ,समूह नृत्य, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये संगीत खुर्चीच्या विजेत्या ठरल्या संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिलाताई कासलीवाल, विजयी शिक्षकांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांनी भेटवस्तू दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.इयत्ता दहावीची विद्यार्थ्यीनीनी कु.कार्तिकी पाटील हिने संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल यांची मुलाखत घेतली .सरानी आपल्या मुलाखतीतून विविध पैलू उलगडताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित केले.शिक्षकाने विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास न करता त्यांचा सर्वांगीण विकास करावा.तसेच शिक्षकांनी द्रोणाचार्यासारखे श्रेष्ठ गुरू बनावे. असा संदेश दिला.
सर्व विद्यार्थीना व शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, सरचिटणीस सौ.प्रमिलाताई कासलीवाल जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, सुशील कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मनी चावला सर,मुख्याध्यापक शरद पवार,विशाल सावंत,गोरख डफाळ यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी रोणक गंगवाल व अनुष्का सोनवणे यांनी तर आभार अनुष्का पगार हिने मानले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.