loader image

गुरुकुल शिक्षण संस्थेत शिक्षकदिन उत्साहात संपन्न

Sep 6, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॳॅण्ड आय.टी.आय नांदगाव या संस्थेत भारताचे दुसरे राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व ५सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.सुरेश नारायणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे,मारुती जगधने, नाना अहिरे , नुकतीच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले व सद्या यशोदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले कळमदरी येथील अक्षय संजय पगार, प्राचार्य विकास झारखंडे,आय.टी.आय.चे प्राचार्य थेटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनुष्य जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. त्यांचे गुण अनंत आहे. ते गुण विद्यार्थ्यांनी आजच्या काळात आत्मसात करुन जीवन यशस्वी करता येईल. व जो शिष्याला मार्ग दाखवतो व त्यावर उपचार करतो तोच खरा गुरु आहे. अश्या गुरुच्या सानिध्यात राहुन तुम्ही तुमचे जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतात प्रा. सुरेश नारायणे यांनी म्हटले. यापुढे ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलच्या अतिवापरापासुन दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षकांना दिलेले ज्ञानाचा दैनंदिन जीवनात योग्य वापर करा. आई-वडिलांइतकेच गुरुचे स्थान आपल्या हृदयात ठेवा. असे संजीव धामणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले तर मारुती जगधने,अक्षय पगार, प्राचार्य विकास झारखंडे,आय.टी.आयचे प्राचार्य थेटे सर यांनीही शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज प्रत्येक कर्मचारी वेळेवर ,व शिस्तबध्द कसे करतात याची सुंदर अशी झलक पीपीटी द्वारे व्हिडिओ फिल्म दाखविण्यात आली. याबरोबरच प्रथम व द्वितीय वर्षात उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गायत्री सानप व खैरनार या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन केले जैन मॅडम,भामरे सर, पाटील सर, सोनवणे मॅडम,अहिरे मॅडम,निकम सर,शिंदे सर,ढासे सर,आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.